‘मतचोरी’चा मुद्दा देशात सर्वात महत्त्वाचा, महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या – राहुल गांधी

देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मतचोरी’चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत, असं म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतचोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

मणिपूरमध्ये 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारावरून मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर आता दोन वर्षांनी पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ मिळाला असून उद्या म्हणजेच 13 सप्टेंबरला मोदी मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले की, “मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून समस्या आहेत, पण नरेंद्र मोदी आता तिथे जात आहेत. मात्र आज देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मतचोरी’चा आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरीला गेल्या आहेत. आज संपूर्ण देश नरेंद्र मोदींना मतचोर म्हणत आहे.”