असं झालं तर… निवृत्तीनंतर पेन्शन सुरू झाली नाही तर…

1 सरकारी नोकरीतून निवृत्त होणाऱया कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते, परंतु काही कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरही पेन्शन सुरू होण्यास विलंब होतो.

2 जर तुमच्या बाबतीत असं काही झालं तर या ठिकाणी काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत. सर्वात आधी पेन्शन देणाऱ्या बँकेमध्ये संपर्क साधा आणि पेन्शन सुरू न झाल्याची माहिती द्या.

3 संबंधित सरकारी विभागाच्या पेन्शन वितरण कार्यालयात संपर्क साधा. पेन्शनसाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर, ओळखपत्र आणि मृत्यूचे प्रमाणपत्र (कुटुंब पेन्शनसाठी) सादर करा.

4 निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱयांच्या बाबतीत कार्यालय प्रमुख पेन्शन प्रकरण सुरू करण्यासाठी जबाबदार असतो. त्यामुळे त्यांच्याशी संपर्प साधा.

5 पेन्शनसाठी सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्षांआधी पेन्शन कागदपत्रे तयार केली जाणे आवश्यक असते. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली आहे का, याची खात्री करा.