
>> दुष्यंत पाटील
शतकानुशतकं प्रतिभावंत चित्रकारांनी कापेंटिंग्ज आजही पाहायला मिळतात. अशाच काही महान चित्रांची आणि चित्रकाराच्या विश्वाची सफर करणारे हे सदर.
पेंटिंग म्हणजे नेमकी काय चीज असते? फक्त कॅनव्हास, त्यातल्या आकृत्या आणि त्यात भरलेले रंग यांनी पेंटिंग बनतं का? म्हटलं तर ‘हो’ आणि म्हटलं तर ‘नाही.’ म्हणजे तांत्रिकदृष्टय़ा आपण त्याला पेंटिंग म्हणू शकतो. पण खऱया पेंटिंगमध्ये अजून ‘काहीतरी’ असतं. पिकासोनं या विश्वविख्यात चित्रकारानं ‘पेंटिंग’वर केलेल्या भाष्याचा उल्लेख अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणतो, ‘पेंटिंग करणं हे आंधळ्या माणसाचं काम असतं. त्याला जे दिसतं, ते त्याला रंगवायचं नसतं, (तर) त्याला जे भावतं (ते त्याला रंगवायचं असतं). त्यानं जे काही पाहिलेलं असतं, त्याविषयी तो स्वतःला जे सांगत असतो, ते त्याला पेंटिंगमध्ये दाखवायचं असतं.’
‘आंधळ्या माणसाचं काम’ म्हणजे शब्दशः ‘आंधळ्या’ माणसाचं काम नव्हे. चित्रकाराला जे समोर दिसतं, ते कॅनव्हासवर ‘कॉपी-पेस्ट’ करायचं नसतं. त्याला पेंटिंग काआपली कल्पना, आपलं भावविश्व कॅनव्हासवर दाखवायचं असतं. त्याला चित्रात त्याचे वैयक्तिक अनुभव दाखवायचे असतात. म्हणजे नेमकं काय? आपण एक उदाहरण पाहूया.
कल्पना करा की, एक चित्रकार रेल्वे स्टेशनबाहेरच्या हॉटेलमध्ये टेबलवर ठेवलेल्या चहाच्या कपाचं चित्र काय. त्याचे जुने मित्र त्याला बऱयाच वर्षांनी या ठिकाणी एकत्र जमलेत आणि जुन्या स्मृतींना उजाळा देताहेत असं मानूया. बाहेर पाऊस कोसळतोय आणि टेबलावरच्या कपामधला चहा वाफाळतोय! जुन्या मित्रांसोबत गप्पा मारताना हा चित्रकार चहाचा अनुभव घेतोय. जर या चित्रकारानं चहाच्या कपाचं पेंटिंग कातर त्याचा चहाच्या कपाचा सुखद अनुभव आपल्याला त्या पेंटिंगमध्ये दिसेल. चहाचा कप दाखवताना तो जसं दिसतं तसं न दाखवता त्यात आपला अनुभवही दाखवेल.
कल्पना करा की, याच हॉटेलमध्ये एक दुसरा चित्रकार एकटाच बसलाय. त्याला रेल्वेनं प्रवास करून गावी जायचंय. गावी काहीतरी दुःखद घटना घडलीये आणि त्याला लवकरात लवकर तिकडे जाणं गरजेचं आहे. पण ट्रेन तब्बल 6 तास उशिरा असल्याचं त्याला कळालंय. या वेळेत तो हॉटेलमध्ये आलाय. बाहेर पाऊस कोसळतोय आणि तो विचारात तळमळतोय. चहा थंड होत असल्याचं त्याच्या लक्षातही आलेलं नाही. आता या दुसऱया चित्रकारानं चहाच्या कपाचं चित्र कातर? या दुसऱया चित्रकाराच्या चित्रातल्या कपात त्याच्या वेदनेचा, विचारांच्या वादळाचा अनुभव मिसळलेला दिसेल. एकाच वेळी, एकाच हॉटेलमध्ये असणाऱया दोन चित्रकारांनी काचहाच्या कपाची चित्रं आपल्याला वेगवेगळे अनुभव दाखवतील! आपले नेमके अनुभव दाखवतानाच चित्रकारांना आपली प्रतिभा दाखवायला लागेल. प्रतिभावंत चित्रकार पेंटिंग काआपल्या कल्पनेतलं विश्व कॅनव्हासवर दाखवताना आपली प्रतिभा वापरतात आणि यातूनच महान कलाकृती जन्माला येतात.
चित्रकलेचं विश्व खऱया अर्थानं समृद्ध केलंय ते अशा चित्रकारांनीच! गूअसूनही जिवंतपणा असणारी लिओनार्दो दा विंची असो वा दैवी सौंदर्य, मानवी भावभावना, सामर्थ्य दाखवणारा मायकेल अँजेलो. दैनंदिन आयुष्यातले आयुष्यातले अनुभव चितारणारा वर्मेअर असो वा युद्ध, वेदना दाखवणारा गोया. वादळ, आकाश आणि समुद्र यांचा अनुभव दाखवणारा टर्नर असो वा आयुष्यातले अस्वस्थ करणारे, अडकवणारे भोवरे दाखवणारा व्हॅन गॉग. अशा कित्येक चित्रकारांची पेंटिंग्ज पाहणं आपल्यासाठी एक खास अनुभव असतो !
शतकानुशतकं प्रतिभावंत चित्रकारांनी कापेंटिंग्ज आपल्याला आजही पाहायला मिळतात. खरं तर, इंटरनेटमुळे अशी महान पेंटिंग्ज पाहणं खूपच अगदी सोपं झालंय. अशा पेंटिंग्जची खरी मजा लुटायची असेल तर प्रत्येक पेंटिंगमधलं चित्रकाराचं कल्पनाविश्व, भावविश्व पाहता यायला हवं. पेंटिंग्जकडे अशा दृष्टिकोनातून पाहता आलं तर ती पेंटिंग्ज आपल्याला एक वेगळंच विश्व उलगडून दाखवतात. पेंटिंग म्हणजे चित्रकाराचं कल्पनाविश्व पाहण्याची एक खिडकी असते. या लेखमालेत आपण काही महान पेंटिंग्जची सफर करणार आहोत. प्रत्येक पेंटिंगमधलं चित्रकाराचं विश्व उलगडणार आहोत. ही सफर आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास वाटतो.