नागपूरच्या रूश सिंधूच्या डोक्यावर सौंदर्यवतीचा मुकुट, मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला

मिस इंडिया इंटरनॅशनल 2025 चा सौंदर्यवतीचा मानाचा मुकुट नागपूरच्या रूश सिंधू या तरुणीने पटकावला आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ती नागपूरला पोहोचली. नागपूर विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकल्यानंतर रूश सिंधू आता 27 नोव्हेंबरमध्ये जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱया मिस इंटरनॅशनल 2025 स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. रूशने याआधी मिस युनिवर्स इंडिया 2025 च्या टॉप 6 मध्ये स्थान मिळवले होते. मी हा खिताब जिंकला आहे, त्यामुळे मी प्रचंड आनंदी आहे. माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे, असे रूश म्हणाली.