
हॉटेलमध्ये हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे जीरा राईस. तो घरी कसा करायचा हे पाहा. बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवा, जेणेकरून त्यातील स्टार्च निघून जाईल. एका पातेल्यात तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे टाका आणि ते सोनेरी रंगाचे आणि सुगंधित होईपर्यंत मध्यम आचेवर परता.
दोन मिनिटे परल्यानंतर त्यात पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. भांडय़ावर झाकण ठेवा. मध्यम आचेवर पाणी उकळेपर्यंत शिजवा. पाणी उकळल्यावर गॅसची आच मंद करा आणि भात शिजवा. भात शिजल्यानंतर लगेच झाकण उघडू नका. गॅस बंद करून भात झाकणासकट 10 मिनिटे तसाच राहू द्या. यामुळे भात पूर्णपणे मोकळा आणि सुवासिक होतो.