
आपल्या दैनंदिन जीवनात रोज ऑनलाईन UPI ने पेमेंट करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्तवाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अनेक UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. याची अमंलबजावणी आजपासून म्हणजे 15 सप्टेंबर पासू्न केली जाणार आहे. NPCI ने व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. डिजिटल व्यवहार सोपे करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
UPI पेमेंटच्या नियमांमध्ये हे महत्त्वाचे बदल 15 सप्टेंबर 2025पासून लागू होत आहेत. त्यामुळे आता नवीन नियमांनुसार, भांडवली बाजार, विमा प्रीमियम, इएमआय, बिल पेमेंट, प्रवास आणि सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) सारख्या श्रेणींमध्यील व्यवहार मर्यादा 2लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. तर दररोज 10 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील.
NPCI २४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात याबाबतची माहिती दिली आहे. UPI आता सर्वात पसंतीचा पेमेंट मोड बनला आहे. त्यामुळे आता मोठ्या व्यवहारांची वाढती मागणी लक्षात घेता, UPI पेमेंटची दैनिक मर्यादा वाढवण्याचे हे पाऊल उचलले जात आहे. ही वाढलेली मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंतच्या कर भरण्याच्या श्रेणीत येणाऱ्या संस्थांना लागू असेल, असे NPCI ने म्हटले आहे.