
अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही कारण ती कडू असते. विशेषतः लहान मुले फक्त त्याच्या नावानेच त्यापासून दूर पळतात. कारल्याची भाजी बनवली जाते आणि बरेच लोक त्याचे लोणचे देखील बनवतात. कारले हे विविध आयुर्वेदीक उपचारांसाठी वापरले जाते.
कडू कारल्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम, जस्त, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. म्हणून कारल्याचा आपल्या आहारात नक्की समावेश केला पाहिजे. मात्र या लेखात आपण कारल्याचा कडूपणा कसा कमी करु शकतो आणि त्यापासून स्वादिष्ट भाजी कशी बनवू शकता हे जाणून घेऊया जेणेकरून प्रत्येकजण आनंदाने आपल्या आहारात कारल्याचा करेल.
कारल्यामध्ये असलेल्या समृद्ध गुणधर्मांमुळे ते अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मधुमेहींसाठी तो विशेषतः फायदेशीर मानला जातो. कारल्यामध्ये कर्करोग-विरोधी, मधुमेह-विरोधी, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध , स्थूलपणा-विरोधी गुणधर्म असतात. ही कडू भाजी तुमच्या आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही.
-
कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले हलकेसे सोलून घ्या आणि छोट्या छोट्या पातळ स्लाइसमध्ये कापून घ्या. त्यानंतर हे स्लाइस दोन ते तीन तासांसाठी उन्हात वाळवून घ्या. कारलं फक्त त्याच्यातील ओलावा कमी होण्यापुरता वाळवावा.
-
कारल्याला कापल्यानंतर त्यावर हळद आणि मीठ लावून एक जाळीदार भांड्यात ठेवावा जेणेकरुन त्यातील एक्स्ट्रा पाणी निघुन जाईल आणि कारल्याचा कडवटपणा कमी होईल.
-
कारल्याची भाजी बनवण्यापुर्वी कारलं 30 मिनिटांसाठी लिंबू लावून ठेवल्याने देखील कारल्यातीत कडवपणा कमी करता येऊ शकतो.
कारल्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत
-
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात कारले घाला आणि काही वेळ परतून घ्या. लक्षात ठेवा की ते जास्त कुरकुरीत होऊ नये.
-
त्यानंतर कारले काढून टिश्यू पेपरवर ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल कमी होईल.
-
त्यानंतर गरजेनुसार गरम तेलात जिऱ्याची फोडणी द्या आणि नंतर चिरलेला कांदा घाला आणि तो सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि त्यात लसूण-आले पेस्ट, धणे पावडर, बडीशेप पावडर आणि सुक्या आंब्याची पावडर घाला. चवीनुसार थोडे लाल मिरची आणि मीठ घाला. मसाला तयार झाल्यावर, कारले घाला आणि शिजू द्या.