पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या

पेरु खाण्यासाठी केवळ चवीलाच नाही तर ते पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व असतात. हे तत्व शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतात.

पेरू हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का पेरूसोबतच त्याची पाने देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. पेरूच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी तसेच खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांचा समावेश असतो.

याशिवाय, पेरूच्या पानांमध्ये बायोएक्टिव्ह गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. पेरूची पाने पचन, केस आणि अगदी डोळे सुधारण्यासाठी फायदेशीर मानली जातात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांचा वापर अनेक प्रकारे करू शकता. जाणून घेऊया की पेरूची पाने कोणते फायदे देतात आणि त्याचा वापर तुम्ही कशा प्रकारे करु शकतात. पेरूची पाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

पेरूच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात, जे हृदयाचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि हृदय निरोगी बनवतात. पेरूची पाने वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. पेरूच्या पानांचे पाणी प्यायले तर ते मासिक पाळीच्या दरम्यान वेदनांपासून देखील आराम देते. पेरूच्या पानांमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे आतड्यांचे आरोग्य मजबूत करण्यासाठी आणि अतिसाराचा धोका कमी करण्यासाठी देखील काम करतात.

पेरुच्या पानांचा वापर तुम्ही कशा प्रकारे करु शकतात

पेरूच्या पानांचा चहा
पेरूच्या पानांचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला 6-7 पेरूची पाने घ्या ती स्वच्छ धुवून पाण्यात उकळण्यसाठी ठेवा . तुम्हाला हवे असल्यास, चवीसाठी तुम्ही त्यात मध, लिंबू किंवा गूळ घालू शकता. हा चहा पचनसंस्था सुधारण्यास खूप मदत करते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी हा चहा घेतला तर वजन कमी होण्यास मदत होईल.

त्वचेसाठी वापरा
पेरूच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्ही पेरूची पाने फेस मास्क म्हणून वापरू शकता. यासाठी पेरूची पाने बारीक करून चेहऱ्यावर लावा. ते चेहऱ्यावरील मुरुमे कमी करतात, तसेच त्वचेवरील जखमा बरे करते आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील उपयुक्त आहे.

 

 

तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठी
तुम्ही तोंड स्वच्छ करण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करू शकता. यामुळे तुमचे तोंड चांगले स्वच्छ होईलच पण तोंडाच्या दुर्गंधीपासूनही आराम मिळेल.

तुम्हाला फक्त पेरूची पाने पाण्यात उकळून थंड करायची आहेत आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे हिरड्यांची सूज कमी होते आणि तोंडातील अल्सर देखील दूर होतात.

केसांच्या मजबूतीसाठी
आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. केस मजबूत ठेवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पेरुची पानं बारीक वाटून त्याचा रस काढावा आणि ते नारळाच्या तेलात मिसळून घ्यावे. हे  मिश्रण टाळूवर चांगले लावा आणि शॅम्पू करा. यामुळे केस मजबूत होतील आणि केस गळणे थांबेल. तसेच, जर तुम्हाला कोंडा असेल तर तुम्हाला त्यापासूनही आराम मिळेल.

रक्तातील साखर नियंत्रित करते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी पेरूच्या पानांचा चहा खूप चांगला मानला जातो. मधुमेहाच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.