Share Market news  – बाजारात तेजी; गुंतवणूकदारांना कमाईची संधी, एकामागोमाग लिस्ट होणार IPO

शेअर बाजारात पुन्हा तेजीचे दिवस आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी यात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 0.70 टक्के वधारला.

सेन्सेक्समध्ये 594 हून अधिक अंकाची वाढ झाली आणि तो 82,350 पार पोहोचला. दुसरीकडे निफ्टी 50 देखील 160 हून अधिक अंकांनी वधारून 25,225 पार गेला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. याच तेजीचा फायदा घेण्यास अनेक कंपन्या उत्सुक असून एकामागोमाग अनेक कंपन्यांचे IPO लिस्ट होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कमाईची चांगली संधी आहे.

कोणते IPO होणार लिस्ट?

  1. GK energy ltd – एनर्जी क्षेत्रातील या कंपनीने 400 कोटींच्या उभारणीसाठी IPO आणला असून याची किंमत 145-153 रुपयांदरम्यान आहे. 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.
  2. Saatvik Green Energy – सोलर एनर्जी क्षेत्रातील या कंपनीचा IPO 19 te 23 सप्टेंबर काळात गुंतवणुकीसाठी ओपन असणार आहे. 900 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी कंपनीने IPO आणला असून याची किंमत 442-465 दरम्यान आहे.
  3. iValue Infosolutions – सायबर सुरक्षा क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 560 कोटी उभारत आहे. 18 ते 22 सप्टेंबर काळात यात गुंतवूक करता येईल आणि शेअर किंमत 284-299 दरम्यान आहे.
  4. JD cable Ltd – ही कंपनी 95.99 कोटी रुपये उभारत असून शेअरची किंमत 144 ते 152 दरम्यान आहे. गुंतवणूकदार 18 ते 22 सप्टेंबर या काळात यात गुंतवणूक करू शकतील.
  5. Jinkushal Industries – कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील ही कंपनी IPO द्वारे 116 कोटी रुपये उभारत आहे. शेअरची किंमत 115-121 दरम्यान असून 25 सप्टेंबर रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी ओपन होईल. 29 सप्टेंबर पर्यंत यात गुंतवणूक करण्याची संधी आहे.
  6. DSM Fresh Food ltd – ही कंपनी IPO द्वारे 59 कोटी रुपये उभारत आहे. शेअर किंमत 96 ते 101 दरम्यान असून 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर काळात यात गुंतवणूक करता येईल.

(टीप – ही फक्त माहिती असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या)