
लंडनमध्ये नुकतेच हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. या स्थलांतरविरोधी मोर्चामधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलक प्रसिद्ध कांदा भजी विकत घेताना दिसत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. शनिवारी ‘युनाईट द किंगडम’ मोर्चादरम्यान हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. टॉमी रॉबिन्सनने आयोजित केलेल्या या रॅलीत एक लाखाहून अधिक जण सहभागी झाले होते. आंदोलकांची गर्दी ही ‘आम्हाला आमचा देश परत हवा आहे’ अशा घोषणा देत साऊथ बँक सेंटर येथून वेस्टमिन्स्टरकडे जात होती. यादरम्यान एका आंदोलकाने एका फूड स्टॉलजवळ थांबून कांदा भजी विकत घेतली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एक्स हँडल @MikeTown44 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.