
सहा महिन्यांच्या बाळाला टाकून महिलेने पळ काढल्याची घटना समोर आली आहे. विरार रेल्वे स्थानकात महिलेने प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करून त्या मुलाला एका प्रवाशी महिलेकडे दिले. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
सोमवारी ते रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी यांच्यासोबत रेल्वे प्रवाशी जनजागरूकता करत होते. दुपारी जनजागृती करून पुन्हा रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात जात होते. तेव्हा एका महिला प्रवाशाने त्यांना आवाज देऊन बोलावले. विरारहून डहाणूला जाणाऱया लोकलच्या डब्यात एका महिलेने तिचे सहा महिन्यांचे बाळ दुसऱया महिलेकडे दिले. महिला प्रसाधनगृहात जाऊन येते असे सांगून ती महिला गेली. बराच वेळ झाल्यानंतर ती महिला परत आली नाही. याची माहिती विरार स्थानकातील स्टेशन मास्टर कार्यालयाला दिली. स्टेशन मास्टर कार्यालयाने उद्घोषणा दिली. बराच वेळ झाल्यानंतर त्या बाळाला घेण्यासाठी कोणीच महिला आली नाही. घडल्या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी एका महिलेविरोधात गुन्हा नोंद केला.