Photo – उद्धव ठाकरे यांचे माँसाहेबांना वंदन, घटनास्थळी पाहणी

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञतांनी रंग टाकण्याचा प्रयत्न केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी देखील आवाज उठवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच माँसाहेबांना वंदन केले. यावेळी शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, विभागप्रमुख, आमदार महेश सावंत तसेच शिवसैनिक उपस्थित होते.