
कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱयांनी ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षणाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी करण्यासाठी ट्रम्प प्रशासन अधिकार कायद्याचा दुरुपयोग करत आहे, असे सांगत ट्रम्प प्रशासनाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासाने लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठावर 1.2 बिलियन डॉलरचा दंड लावला तसेच संशोधन फंडिंग थांबवली.