
जॉर्जियाला गेलेल्या 56 हिंदुस्थानी पर्यटकांचे प्रचंड हाल करण्यात आल्याचा दावा एका तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून केला. पर्यटक म्हणून गेलेल्या 56 हिंदुस्थानी नागरिकांना आर्मेनियाहून जॉर्जियात प्रवेश करू दिला नाही. वैध ई-व्हिसा आणि आवश्यक कागदपत्रे दाखवूनही तेथील अधिकाऱ्यांनी पर्यटकांसोबत अमानवी व्यवहार केला. वेळेवर जेवण दिले नाही. शौचालयालाही जाऊ दिले नाही.