
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ठप्प पडलेली वैष्णोदेवी यात्रा 22 दिवसांनंतर बुधवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता दोन्ही मार्गांवरील यात्रा सुरू करण्यात आली आहे. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमध्ये चैतन्य पसरले आहे. ‘जय माता दी’च्या घोषणा देत भाविक दर्शनासाठी पोहोचले आहेत. यात्रेसाठी सर्व भाविकांना ओळखपत्र आणि आरएफआयडी कार्ड स्वतःजवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.