
इंडिगो एअरलाइनने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत इंडिगो विमान प्रवास केवळ 1299 रुपयात करता येऊ शकणार आहे. इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी ग्रँड रनवे फेस्ट ऑफर लाँच केलीय. या ऑफर अंतर्गत देशांतर्गत फ्लाइटचे तिकीट केवळ 1299 रुपयामध्ये तर आंतरराष्ट्रीय तिकीट केवळ 4599 रुपयांपासून सुरू होते. कंपनीची ही ऑफर 21 सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ग्राहकांना कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करता येईल. या ऑफर अंतर्गत तिकिटाची तारीख 7 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणार आहे. या ऑफर अंतर्गत इकॉनोमी क्लासचे तिकीट 1299 रुपये, बिझनेस क्लासचे तिकीट 9999 रुपयांपासून सुरू होते.