युद्धाला सहा दशके पूर्ण!

हिंदुस्थानपाकिस्तान यांच्यात 1965 मध्ये झालेल्या युद्धाला 60 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने दिल्लीत हिंदुस्थानी लष्कराने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित होते.