पडळकरांविरोधात सांगलीत तीव्र संताप; ‘जोडे मारो’ आंदोलन, निषेध मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते-आमदार जयंत पाटील यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लाघ्य वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सांगली शहरात वाचाळवीर पडळकर यांच्या प्रतिमेला महिलांनी जोडे मारले. तर, जत आणि ईश्वरपूरमध्ये निघालेल्या मोर्चात जोरदार निषेध करण्यात आला. ‘भाजप नेतृत्वाचा खरा चेहरा यानिमित्ताने समाजासमोर आला,’ असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला. दरम्यान, आमदार जयंत पाटील सांगली शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांत व्यस्त होते. याविषयी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलामहिलांनी जोडे मारले. तर, जत आणि ईश्वरपूरमध्ये निघालेल्या मोर्चात जोरदार निषेध करण्यात आला. ‘भाजप नेतृत्वाचा खरा चेहरा यानिमित्ताने समाजासमोर आला,’ असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला. दरम्यान, आमदार जयंत पाटील सांगली शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांत व्यस्त होते. याविषयी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

ईश्वरपूरमध्ये जोरदार निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज ईश्वरपूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोर्चा काढून जोरदार निषेध करण्यात आला. आमदार पडळकर यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा घरातून बाहेर पडून देणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सुनीता देशमाने, शहाजी पाटील, श्यामराव पाटील, विजयराव यादव, माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजीत पाटील आदी उपस्थित होते.

सांगलीत ‘जोडे मारो’ आंदोलन
येथील स्टेशन चौकातील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवक राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, संगीता हारगे, शेखर माने, ताजुद्दीन तांबोळी, राजू जानकर, वैभव शिंदे, सचिन जगदाळे, सागर घोडके, आयुब बारगीर, उमर गवंडी, टी. व्ही. पाटील, हरिदास पाटील, संदीप व्हनमाने, ज्योती आदाटे, शेडजी मोहिते, नर्गिस सय्यद, अभिजित भोसले, राजू पाटील, अर्जुन कांबळे, समीर कुपवाडे, अक्षय अलकुंटे, उमेश आवटी सहभागी झाले होते.

जत येथे प्रचंड मोर्चा
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जत शहरातून प्रचंड निषेध मोर्चा काढला. छत्रपती संभाजी महाराज चौकातून पोलीस ठाण्यावर निघालेल्या या निषेध मोर्चात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जयंत पाटील व राजारामबापूप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पडळकरांविरोधात निषेधाच्या घोषणा देत, फडणवीस सरकारने त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली. यावेळी माजी आमदार-काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सांवत, सुजय शिंदे, विवेक कोकरे यांच्यासह अनेकांनी आमदार पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठविली. भाजपने पोसलेल्या वाचाळवीर पडळकरांना भाजपनेच आवरावे, अशी मागणीही करण्यात आली