तालिबानी अतिरेक : महिलांनी लिहिलेल्या पुस्तकांवर बंदी

तालिबान सरकारने अफगाणिस्तानातील विद्यापीठांमधून महिलांनी लिहिलेली पुस्तके काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत आणि मानवी हक्क व लैंगिक छळावरील अभ्यासांनाही बेकायदेशीर ठरवले आहे.

तालिबानने एकूण 679 पुस्तकांवर बंदी घातली आहे, ज्यात महिलांनी लिहिलेल्या सुमारे 140 पुस्तकांचा समावेश आहे, जे त्यांच्या धोरणांच्या आणि शरीयाच्या विरोधात असल्याचा दावा तालिबानींनी केला आहे. याशिवाय महिलांशी संबंधित विषयांवरही बंदी लागू केली आहे. लिंग आणि विकास, महिला समाजशास्त्र आणि संवादात महिलांची भूमिका असे विषय आहेत.

गेल्या चार वर्षांपासून तालिबानने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. अलीकडेच तालिबानने 10 प्रांतांमध्ये वाय-फायवर बंदी घातली आहे. अधिकाऱयांचे म्हणणे आहे की, हे अनैतिक कृत्ये रोखण्यासाठी करण्यात आले आहे, परंतु तालिबानच्या या निर्णयाचा महिला आणि मुलींवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.