
दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र नागरगोजे यांना जाहीर झाला आहे. नागरगोजे हे सध्या नायगाव येथील सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहेत. दिल्ली येथे 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये नागरगोजे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. नागरगोजे यांनी पोलीस खात्यामध्ये कर्तव्य बजावतानाच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.































































