
अफगाणिस्तानचा बगराम हवाई तळ पुन्हा ताब्यात घेण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बगराम एअरबेसच काय, एक मीटरही जमीन अमेरिकेला मिळणार नाही, असे आव्हान तालिबानने दिले आहे.
अफगाणिस्तानातून सैन्य हटवताना अमेरिकेने तेथेच सोडलेल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन मागील वर्षी तालिबानने भरवले होते. त्यानंतर अमेरिकेसह जगाचे लक्ष त्याकडे गेले. ट्रम्प यांनी मागील बायडन सरकार टीकास्त्र डागले होते. अफगाणिस्तान सोडताना बरगाम एअरबेस सोडायला नको होता. हा एअरबेस पुन्हा घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे ट्रम्प नुकतेच म्हणाले. त्यावर तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे.