
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट 24 डिसेंबर रोजी उलगडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर घेतलेल्या प्रतिज्ञापासून ते त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा समग्र इतिहास सावरकर चरित्र गायक सतीश भिडे हे ‘गीत वीर विनायक’ या कार्यक्रमातून मांडणार आहेत. चेंदणी कोळीवाडा येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टच्या लक्ष्मीबाई केळकर सभागृहात हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. सावरकरांचा जीवनपट ज्येष्ठ चरित्र गायक सतीश भिडे सांगीतिक प्रवासातून मांडणार आहेत. भिडे यांनी या कार्यक्रमाचे 3 हजार 183 विनामुल्य प्रयोग केले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार जगभरात पोहोचवले आहेत.
शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद
या कार्यक्रमाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला आहे. दिवंगत गायक सुधीर फडके, नानासाहेब धर्माधिकारी, स्वामी विद्यानंद, कसोटीवीर माधव मंत्री, व्हाइस अॅडमिरल एम.पी.आवटी अशा अनेक दिग्गजांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे.