एरंडेल तेल की खोबरेल तेल? त्वचेसाठी कोणते तेल सर्वात उत्तम, वाचा

प्रत्येकाला त्यांची त्वचा नेहमीच तरुण, मऊ आणि चमकदार राहावी असे वाटते. पण जसजसे आपण वयस्कर होतो तसतसे आपल्या चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात. एरंडेल तेल आणि नारळ तेल हे नैसर्गिक उपाय म्हणून खूप लोकप्रिय आहेत. दोन्ही तेले त्वचेचे पोषण आणि वृद्धत्व विरोधी आहेत. योग्यरित्या वापरल्यास ते तुमच्या त्वचेचे सौंदर्य वाढवू शकतात.

Skin Care – त्वचा नैसर्गिकपणे उजळण्यासाठी हे फेशियल करायला हवे

एरंडेल तेल

एरंडेल तेलामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म भरपूर असतात. ते त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते.

रात्री चेहरा धुतल्यानंतर, एरंडेल तेलाने हलका मसाज करा. या तेलाच्या नियमित वापरामुळे त्वचा मऊ मुलायम आणि तरुण दिसते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आणि कोरडेपणा देखील कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी या पानांचा वापर करुन बघा, रिझल्ट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

खोबरेल तेल

खोबरेल तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला तरुण दिसण्यास मदत करतात. ते त्वचेला खोलवर पोषण देते आणि हळूहळू सुरकुत्या कमी करते.

सकाळी किंवा रात्री हलका मालिश केल्याने त्वचा मऊ आणि चमकदार राहते. हे तेल त्वचेची लवचिकता राखते आणि कोरडेपणा टाळते.

काळी मिरी तुपासोबत का खावी? वाचा

एरंडेल तेल की खोबरेल तेल?
तुमची त्वचा कोरडी आणि सुरकुत्या पडली असेल तर एरंडेल तेल सर्वात उत्तम आहे. यामुळे आपल्या त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ होण्यास मदत मिळते.

तुम्हाला दररोज हलके हायड्रेशन आणि चमक हवी असेल तर नारळ तेल हा पर्याय उत्तम मानला जातो.

दोन्ही तेले वापरु शकता. म्हणजे सकाळी नारळ तेल आणि रात्री एरंडेल तेल.

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘या’ पानांची पेस्ट आहे खूप गरजेची, वाचा

झोपण्यापूर्वी एरंडेल तेल लावल्याने त्वचेला खोलवर पोषण मिळते.

दिवसा नारळ तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाऊ शकते.

तरुण आणि चमकदार त्वचा मिळणे आता अगदी दुरापास्त झाले आहे. परंतु ही दोन्ही तेलं नियमित वापरल्याने, आपल्या चेहऱ्याचा कोरडेपणा कमी होतो. तसेच आपली त्वचा निरोगी, मऊ मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.