
गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षणासाठी कर्ज आणि अन्य काही कामांसाठी बँक स्टेटमेंट आवश्यक आहे. तुम्ही जर बँक स्टेटमेंट दिले नाही तर कामे रखडतात.
जर तुम्हाला बँक स्टेटमेंट तत्काळ हवे असेल आणि ते जर उशिरा मिळत असेल तर फार चिंता करण्याची गरज नाही. यासाठी काही सोपे मार्ग आहेत.
बँकेच्या शाखेत जाऊन बँक स्टेटमेंटसाठी रितसर अर्ज करा. जर बँकेला सुट्टी असेल किंवा बँकेकडून स्टेटमेंट देण्यास उशीर होत असेल तर अन्य मार्गाचा अवलंब करा.
इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अॅपचा वापर करून बँक स्टेटमेंट मिळवता येते. काही वर्षांपर्यंतची स्टेटमेंट ऑनलाइन पाहण्याची सुविधा अनेक बँका देतात.
बँकेने दिलेल्या पासबुकचा योग्य वापर करा. वेळोवेळी ते अपडेट करत राहा. यामुळे तुम्हाला जेव्हा बँक स्टेटमेंटची गरज लागेल तेव्हा तुम्ही व्यवहाराची नोंद तपासू शकता.