हिंदुस्थानातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीत एकामागोमाग एक स्फोट, अंदमान बेटांजवळ 4.2 तीव्रतेचा भूकंप

हिंदुस्थानातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीमध्ये पुन्हा स्फोट सुरू झाले आहेत. अंदमान-निकोबार बेटांचा भाग असलेल्या बॅरेन बेटांवर 13 आणि 20 सप्टेंबर रोजी दोन स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या ज्वालामुखीच्या स्फोटाचा व्हिडीओ हिंदुस्थानच्या नौदलाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

बॅरेन बेट पोर्ट ब्लेअरपासून साधारण 140 किलोमीटर दूर ईशान्येला अंदमान समुद्रामध्ये स्थित आहे. या स्फोटांमुळे अंदमान बेटाला 4.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. सुदैवाने यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.