डोळ्याखालील काळी वर्तुळे आता होतील गायब, फक्त दिवसातून दोनदा हा उपाय करुन बघा

काळ्या वर्तुळांमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब झाले आहे का? हा प्रयोग केल्याने तुमच्याही डोळ्याखालील काळी वर्तुळे चुटकीसरशी गायब होतील. आजच्या जीवनशैलीत डोळ्याखालील काळी वर्तुळे ही एक सामान्य समस्या बनली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघणे, झोपेचा अभाव आणि वाढता ताण ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे येण्याची प्रमुख कारणे आहेत. डोळ्याखालील काळ्या वर्तुळांमुळे आपला चेहरा थकलेला आणि अधिक प्रौढ दिसू लागतो.

नाभीमध्ये तूप घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, महिलांनी हा उपाय करुन पाहायला हवा

डोळ्याखाली काळी वर्तुळे होण्याची कारणे

झोपेचा अभाव तसेच वाढते वय ही दोन प्रमुख कारणे काळी वर्तुळे येण्याची आहेत. याजोडीला ऍलर्जी आणि डिहायड्रेशन तसेच अधिक काळ मोबाईल पाहणे, प्रखर सूर्यप्रकाशात फिरणे यामुळेही काळी वर्तुळे होतात.

डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर घरगुती उपाय

कच्चे दूध
हळद
मध
कॉफी पावडर

कसे लावाल?

कच्चे दूध एका भांड्यात घाला. त्यात हळद, मध आणि कॉफी पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. १० मिनिटांनी धुवा.
आठवड्यातून दोनदा हा उपाय करुन बघा फरक नक्की दिसून येईल.

पिकलेले केस होतील काळे कुळकुळीत, चहापावडरमध्ये फक्त 5 रुपयांचा हा घटक घाला, वाचा सविस्तर

कच्चे दूध – त्वचेला हायड्रेट करते आणि पोषण देते.

हळद – दाहक-विरोधी गुणधर्म सूज आणि काळे डाग कमी करतात. मध – त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि मऊ करते.

कॉफी पावडर – रक्ताभिसरण वाढवून सूज आणि काळेपणा कमी करते.