भाजप आमदार आता तरी सीएम फंडात मदत करणार की मोदींकडे पाठवणार

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱयांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभं असून, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. भाजप आमदार सीएम फंडात मदत करणार, की सवयीप्रमाणे मोदींकडे पीएम फंडात मदत पाठवणार, अशी चर्चा आहे.

कोरोना काळात राज्यातील जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचे टाळून भाजपच्या आमदार आणि खासदारांनी पीएम केअर फंडात मदत पाठवली होती. महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली असताना आता भाजपचे मंत्री, आमदार, खासदार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करतील का, असा प्रश्न समाज माध्यमांद्वारे केला जात आहे.

अजितदादा गटाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अतिवृष्टीने राज्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटाचे सर्व मंत्री, खासदार, आमदारांना एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.