
विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर, त्याच्यासाठी एक नवीन संधी चालुन आली आहे. बॉलिवूड स्टार विक्रांत मेस्सी ‘दोस्ताना २’ चित्रपटात आता प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात विक्रांत पहिल्यांदाच दिसणार आहे. ‘दोस्ताना २’ मध्ये सुरुवातीला कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि नवीन कलाकार असणार होते. परंतु सध्याच्या स्टारकास्टमध्ये पूर्णपणे बदल करण्यात आले आहेत. चित्रपटात आता विक्रांत मेस्सी आणि लक्ष्य हे कलाकार दिसणार आहेत.
View this post on Instagram
एका संभाषणादरम्यान विक्रांतने त्याच्या भूमिकेची पुष्टी केली आणि तो पूर्णपणे नवीन अवतारात दिसणार असल्याचे उघड केले. तो पुढे म्हणाला, “मी पहिल्यांदाच धर्मा प्रोडक्शन सोबत काम करत आहे.” विक्रांतने असेही सांगितले की, या चित्रपटातून मी तुम्हाला वेगळ्या रुपात दिसणार आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीबद्दल मात्र विक्रांतने मौन बाळगले आहे. परंतु त्याने या चित्रपटातील त्याचा सहकलाकार लक्ष्य असणार आहे हे मात्र उघड केले आहे. लक्ष्य अलीकडेच आर्यन खानच्या दिग्दर्शित पदार्पणाच्या मालिकेत, “द बॅड्स ऑफ बॉलिवूड” मध्ये दिसला होता.