शॉवरचा वेग कमी झाल्यास

 बाथरूममधील शॉवरला चांगला वेग असेल तर अंघोळ करण्याची मज्जा काही औरच आहे, परंतु कधी कधी अचानक शॉवरचा वेग कमी होतो. त्यामुळे शॉवरचा जो फवारा अंगावर पडतो, त्याचा दाब कमी असतो. तुमच्या घरातील शॉवरचा वेग कमी झाला असेल तर काय करावे हे तुम्हाला सूचत नसेल तर या ठिकाणी काही सोप्या टिप्स आहेत.

 सर्वात आधी शॉवरहेड पाईपपासून वेगळे करा. ते एका बादलीत व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवा, जेणेकरून चुनखडी विरघळेल. काही तासांनंतर शॉवरहेड स्वच्छ धुवा आणि परत जोडा. शॉवरहेडची छिद्रे ब्रशने किंवा सुईने स्वच्छ करा. असे केल्याने शॉवरचा वेग वाढू शकतो. जर शॉवरहेड खराब झाले असेल तर ते नवीन बदलून घ्या.