
अझीम प्रेमजी हे नाव उद्योग जगतामध्ये नवीन नाही. विप्रो या जगविख्यात कंपनीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. हिंदुस्थानात आयटी उद्योग पसरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र याच अझीम प्रेमजी यांनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एक मागणी धुडकावून लावली आहे.
बंगळुरू शहरातील आऊटर रिंग रोडवरील वाढते ट्राफिक जाम कमी करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी आयटी कंपनी विप्रोला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. नागरिकांना मर्यादित काळासाठी कंपनीच्या सरजापूर कॅम्पसमधून जाण्य-येण्याची परवगानगी देण्यात यावी, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी अझीम प्रेमजी यांना केली होती. याबाबत सिद्धरामय्या यांनी 19 सप्टेंबर रोजी पत्रही लिहिले होते. मात्र यास अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.