Photo – अभंग तुकाराम चित्रपटातील आवलीच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का?

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संत तुकारामांची पत्नी आवलीची देखील मुख्य भूमिका असून ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने साकारली आहे. मात्र आवलीच्या भूमिकेतील स्मिताला ओळखता देखील येत नाहीए. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.