
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रतिष्ठा सांभाळा
मेषेच्या सप्तमेषात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. सणाचा प्रत्येक दिवस यशस्वी करता येईल. सहनशीलता ठेवा. प्रतिष्ठा सांभाळा. नोकरीत वरिष्ठांच्या कलाने घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक विरोध करतील.
शुभ दि. 29, 30
वृषभ – संयम ठेवा
वृषभेच्या षष्ठेशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला चर्चा करताना वाद होतील. संयम ठेवा. विरोधकांना शह द्याल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. कुणालाही कमी लेखू नका. व्यवहार नीट तपासा.
शुभ दि. 28, 2
मिथुन – अहंकार दूर ठेवा
मिथुनेच्या पंचमेषात बुध, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. क्षुल्लक कारणाने अडचणी निर्माण होतील. अहंकार दूर ठेवा. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गरज पडल्यास व्यक्त व्हा.
शुभ दि. 29, 4
कर्क – शब्द जपून वापरा
कर्केच्या सुखेषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. चर्चा करताना कोणालाही कमी लेखू नका. शब्द जपून वापरा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात नव्या कामाचे आश्वासन मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील.
शुभ दि. 28, 2
सिंह – कामाची प्रशंसा होईल
सिंहेच्या पराक्रमात बुध, चंद्र गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ तणाव होतील. मनाप्रमाणे घटना घडतील. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. धंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मतभेदांची उकल होईल.
शुभ दि. 29, 30
कन्या – मन अस्थिर होईल
कन्येच्या धनेषात बुध, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. समस्येवर मार्ग शोधता येईल. क्षुल्लक कारणाने मन अस्थिर होईल. वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रगती होईल. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामाला गती मिळेल.
शुभ दि. 28, 2
तूळ – कामे रेंगाळतील
स्वराशीत बुध, चंद्र गुरू प्रतियुती. संताप व अहंकार ठेऊ नका. कामे रेंगाळतील. नोकरीत मनमानी करू नका. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात वाढ होईल. वाद दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची मर्जी राखता येईल. परिचय वाढतील.
शुभ दि. 28, 29
वृश्चिक – व्यवहारात सावध रहा
वृश्चिकेच्या व्ययेषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस प्रेरणादायक. कठीण प्रश्न मार्गी लागतील. श्रीमातेची कृपा राहील. वाहनाचा वेग कमी ठेवा. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांना मदत कराल.
शुभ दि. 30, 2
धनु – कार्याचा गवगवा होईल
धनुच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. ठरवलेले कार्यक्रम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कार्याचा चौफेर गवगवा होईल. व्यवहारात भिडस्तपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिचय होतील. तुमच्या कार्याची प्रशंसा होईल.
शुभ दि. 1, 2
मकर – फसगत टाळा
मकरेच्या दशमेषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला अडचणी येतील. राग दूर ठेवा. नोकरीत अस्थिरता येईल. धंद्यात फसगत टाळा. मोह, व्यसनापासून दूर रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल होईल.
शुभ दि. 2, 4
कुंभ – समस्या वाढतील
कुंभेच्या भाग्येषात बुध, चंद्र गुरू प्रतियुती. क्षुल्लक घटना समस्या वाढवतील. अहंकार दूर ठेवा. दूरदृष्टिकोन बाळगा. धंद्यात कटुता नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. सहनशीलता ठेवा. अडचणी तात्पुरत्या ठरतील.
शुभ दि. 29, 30
मीन – प्रकृतीची काळजी घ्या
मीनेच्या अष्टमेषात बुध, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. प्रकृतीची काळजी घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. तुमचे महत्त्व वाढेल. नोकरीत तडजोड ठेवा. वरिष्ठ खूष होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठोर होणे हितकारक नाही. शत्रुत्व वाढवू नका.
शुभ दि. 1. 2