Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली

मराठवाड्यामध्ये पावसाचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे.  नदी-नाले तुडुंब झाले आहेत असून धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेक महामार्ग पाण्याखाली गेले असून काही भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 10 ते 12 तासापासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली असून प्रशासन अलर्ट आहे.

वाचा प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपटेड –

  • लातूर तालुक्यातील जोड जवळा येथील ओढ्याला पूर आल्यामुळे लातूर-कळंब रस्त्यावरील वाहतूक ठप्प.

  • लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे साकोळ गावात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना इतरत्र हलवले जात असून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • धाराशिव तालुक्यातून वाहणाऱ्या तेरणा नदीला मागील 15 दिवसातून पाचव्यांदा पूर आला आहे. या पुरामुळे सांगवी – कामेगाव हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

  • धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे बार्शी-परंडा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

  • अहमदपूर तालुक्यातील कोपरा तलावाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याने रौद्र रूप धारण केले असून बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे.

  • कळंब तालुक्यातील सापनाई येथील तेरणा नदीत गाय वाहून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

  • अंबुलगा बुद्रुक येथे ओढ्याचे पाणी शेतात शिरले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच या पाण्यामुळे रस्ताही वाहून गेला आहे.

  • जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे नदीची पाणी पातळी वाढली, नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

  • किनगाव-अहमदपूर रोडवरील कोपरा गावालगत वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर आल्याने नदीकाठच्या नागरिकांना कोपरा सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व बस सेवा थांबविण्यात आली आहे.

  • हिंगोलीमध्ये पावसाचा हाहाकार सुरू

हिंगोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; चौंढी बहिरोबा, बिबथर व कोंढूर डिग्रस गावांचा संपर्क तुटला; दांडेगावातील शेत शिवारात पाणी शिरले, सर्व शाळांना सुट्टी जाहीर

  • बीड शहरात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण पोलीस ठाणे अन् शिवाजीनगर पोलीस ठाणेही सध्या पाण्यात आहे. गुडघ्याएवढे पाणी साचल्याने दोन्ही पोलीस ठाण्यातील काम सध्या बंद आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील शिरूर (मुखेड) मार्गावर वळसंगी येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

  • धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली
  • लातूरच्या जळकोट तालुक्यातील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आली आहे

  • शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे बसपूर ते बाकली जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  • कळंबमध्ये पावसाचा हाहाकार, बागवान चौकातील नगर परिषदेतील गाळ्यांमध्ये पाणी शिरलं

  • लातूरमधील औसा तालुक्यातील मौजे एरंडी ते औसा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

  • परभणीतील गंगाखेड येथे रात्रीतून 143 मिलीमीटर पाऊस झाला.
  • लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पेठ व चांडेश्वर येथे पूर परिस्थितीची पाहणी केली.

  • माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले, 80 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू
  • धाराशिवमध्ये बाजारपेठेत पाणी घुसलं
  • जालन्यामध्ये तुफान पावसाला सुरुवात
  • बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर

Beed Rain Update – बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर

  • हिंगोलीत ढगफुटी, वसमतमध्ये परिस्थिती बिकट; हिंगोली-पुसद मार्ग बंद, विदर्भाशी संपर्क तुटला
  • धाराशिव तालुक्यातील आरणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

  • धाराशिवमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच आपत्ती निवारण पक्षही कार्यान्वित झाले असून परंडा तालुक्यातील वाघेगव्हाण येथे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

  • लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हागदळ पुलावर पाणी, वाहतूक बंद

  • मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील नद्यांना पुन्हा पूर आला आहे. पाटसांगवी येथील दुधना नदीने रौद्ररुप धारण केले असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • लातूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे थोडगा-मोघा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पर्यायी रस्ता टेंभुर्णी -हसरणी-धानोरा खू. मार्गे आहे.

  • नांदेड शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी पहाटे 3 वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्ह असून हवामान विभागाने नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे.

नांदेडला ‘ऑरेंज अलर्ट’, विष्णुपुरी प्रकल्पाचे 16, तर इसापूर धरणाचे 9 दरवाजे उघडले; सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

  • लातूरच्या मान्याड नदीच्या पाणी पातळीत वाढ, शेणकुडमधील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद

  • धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात; नदी-नाले तुडुंब, शेतीचे प्रचंड नुकसान. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट.