
शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी 27 सप्टेंबर रोजी सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.
श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री तुळजाभवानी देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. काल शुक्रवार रोजी श्री तुळजाभवानी देवीजींची छबिना मिरवणूक वाघ वाहनांवरुन काढण्यात आली.
शारदीय नवरात्र महोत्सवात 27 सप्टेंबर रोजी सहाव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. #Navratri2025 #tuljapur #saamanaonline pic.twitter.com/EK8fEprG8n
— Saamana Online (@SaamanaOnline) September 27, 2025