
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईतील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शनिवारी सकाळीही मुंबईत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता राज्यातील सर्व जिह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला
आहे.
z हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असेल. जिल्हा प्रशासनांनी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.