पालघरमधील पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर

पालघर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या सोडतीमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि गैरअनुसूचित क्षेत्रातील एकूण आठ पंचायत समितींमध्ये सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षणात जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्यांवर अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गाचे वर्चस्व दिसून आले आहे. पालघर पंचायत समितीचे सभापतीपद ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पालघर तालुक्यातील इतर मागास प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांसाठी नेतृत्वाची संधी निर्माण झाली आहे.

आरक्षणाचा तपशील

पालघर – नागरिकांचा मागास प्रवर्ग, वसई- अनुसूचित जमाती महिला, मोखाडा – अनुसूचित जमाती महिला, डहाणू -अनुसूचित जमाती महिला, विक्रमगड अनुसूचित जमाती महिला, तलासरी अनुसूचित जमाती, जव्हार अनुसूचित जमाती, वाडा – अनुसुचित जमाती.