
सर्वांची लाडकी अभिनेत्री श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात बातम्या आणि काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र अद्यापही या दोघांनीही या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. रश्मिका आणि विजय दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. मात्र कधीही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिली नव्हती. दरम्यान रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या दोघांनीही आपल्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा केला आहे.
रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याची बातमी येताच नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच हे जोडपं पुढील वर्षी फेब्रुवारीमध्येलग्न करणार असल्याच्याही चर्चा सुरु आहेत. हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असेल. त्यामुळे सर्व नेटकरी आता लवकरच या लग्नाबाबक अधिकृत घोषणा होण्याची वाट पाहत आहेत.
रश्मिका आणि विजय यांनी गीता गोविंदम या चित्रपटात एकत्र काम केले होते. रश्मिकाने आत्तापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीता गोविंदम” ने तिला मोठी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने “देवदास,” “यजमान, “डियर कॉम्रेड,” “भीष्म, “सरीलेरू नीकेव्वारु, “पुष्पा: द राईज, आणि “पुष्पा २: द रूल”, “अॅनिमल” आणि “छावा या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच अभिनेता विजय देवेराकोंडाने रवी बाबू दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी “नुव्विला” द्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. यानंतर अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड, “लायगर यांसारख्या अनेक चित्रपटात त्याने काम केलं.