भटक्या कुत्र्यांमुळे हिंदुस्थानची नाचक्की! दिल्लीत दोन विदेशी प्रशिक्षकांना कुत्र्याचा चावा

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांमुळे हिंदुस्थानला मान शरमेने खाली घालायला लागली. दिल्लीत सध्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू आहे. या निमित्ताने जगभरातील खेळाडू आणि प्रशिक्षक या ठिकाणी आले आहेत. परंतु, या स्पर्धेच्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांत केनिया आणि जपानच्या प्रशिक्षकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. केनियाचे स्प्रिंट प्रशिक्षक डेनिस म्वांझो आणि जपानचे सहायक प्रशिक्षक मिको ओकुमात्सु या दोन्ही प्रशिक्षकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या घटनेमुळे हिंदुस्थानची नाचक्की मात्र झाली आहे. डेनिस यांना सकाळी साडेनऊच्या सुमारास भटक्या कुत्र्याने चावा घेताल. त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिको ओकुमात्सु यांनाही सकाळी सरावावेळी भटका कुत्रा चावला.

n दिल्लीत 2024 मध्ये 25 हजार 210 भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे. 2023 मध्ये हेच प्रमाण केवळ 17 हजार 847 इतके होते. जानेवारी महिन्यात दिल्लीत भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या 3200 घटना घडल्या आहेत. दिल्लीत भटक्या कुत्र्यांची संख्या 8 लाखांपेक्षा जास्त आहे.