एच 1 बी व्हिसा शुल्कवाढीला,कोर्टात आव्हान

एच 1 बी व्हिसातील जबर शुल्कवाढीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतच विरोध होत असून तेथील कामगार संघटना, कंपन्या व धार्मिक संघटनांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एच 1 बी व्हिसाचे शुल्क वाढवण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय बेकायदा आहे. हा निर्णय रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांकडे स्वतंत्रपणे महसूल उभारण्याचा किंवा कर लादण्याचा अधिकार नाही आणि ते हा निधी कसा वापरायचा हेदेखील ठरवू शकत नाहीत, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.