पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; भूस्खलनानंतर दार्जिलिंगमध्ये लोखंडी पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर मिरिक परिसरातील दुधिया लोखंडी पुल तुटून 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा पुल मिरिक आणि आसपासच्या परिसरातील सिलिगुडी कुर्सियांग परिसराला जोडतो. संततधार पावसामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. भूस्कलन आणि पूरामुळे बचाव पथकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, मिरिकमध्ये आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ,सौरानीमध्ये 3, मिरिकमध्ये 2 आणि विष्णू गावात 1 चा मृत्यू झाला आहे. स्थानीय प्रशासनाने बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.