ट्रेंड – घाबरट राजा

झुंड में तो सुअर आते है… शेर अकेला आता है… असा डायलॉग आपण अनेक चित्रपटांत ऐकलेला आहे. तो म्हटलं तर खराही आहे. सिंह हा जंगलाचा राजा असतो त्यामुळे त्याला सोबतीची काय गरज? राजाला आव्हान कोण देणार? असे कोणालाही वाटेल. पण हा डायलॉग खोटा ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान ट्रेंड होतोय. यात शिकारीच्या शोधात असलेला सिंहांचा कळप एका झेब्र्यावर तुटून पडलेला दिसत आहे. हे घाबरट राजे चहूकडून त्याचे लचके तोडत आहेत. एवढया सगळ्यांच्या तावडीतून सुटणे झेब्र्याला कसं जमणार? बिचारा हकनाक बळी जातो. हा व्हिडिओ अंगावर अक्षरशः काटा आणणारा आहे. https://tinyurl.com/yzhme7ez या लिंकवर हा व्हिडिओ पाहता येईल.