
निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेत देखील तेच होताना दिसत असल्याची टीका रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत केली आहे.
‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे… गणपती नंतर दिवाळीत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 6, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे कायम त्यांच्या एक्सच्या माध्यमातून प्रखरपणे आपली मतं मांडत असतात. अशातच त्यांनी आज सोशल मिडिया साईट एक्सवर पुन्हा एकदा पोस्ट शेअर करत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे., त्यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये लिहीले की, ‘निवडणुका सरो..मतदार मरो’ या तत्वाने काम करणाऱ्या देवा भाऊ सरकारने आता आनंदाचा शिधा योजनेवर देखील गदा आणली आहे. योजनेला निधी उपलब्ध न करून अप्रत्यक्षपणे योजनाच बंद करण्याचा नवा फॉर्म्युला या सरकारने आणला असून आनंदाचा शिधा योजनेबत देखील तेच होताना दिसत आहे… गणपती नंतर दिवाळीत देखील आनंदाचा शिधा मिळणार नसल्याचं समोर येत आहे…..*निधी नाही म्हणून की शिंदे साहेबांनी आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय हा संशोधनाचा विषय असला तरी* 20 लाखांची गादी–सोफा वापरणारे अलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल तर मग या सरकारला काय म्हणावे? असे लिहून त्यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला आहे.