
सुप्रसिद्ध जाहिराततज्ञ आणि फेमस इमोव्हेशनचे फाऊंडर राज कांबळे यांची ‘द अॅण्डी’ अॅवॉर्ड रिजनल्स’साठी आशियाई अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान पटकावणारे देशातील ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. आपला आनंद व्यक्त करताना राज कांबळे म्हणाले, यंदाच्या ‘अॅण्डी’ अॅवॉर्ड्स रीजनल्स’मध्ये आशिया ज्युरीचे अध्यक्षपद भूषवताना मला खूप आनंद होतोय. अॅण्डी नेहमीच निर्भय, सर्जनशीलता आणि धाडसी कल्पनांसाठी उभे राहिले आहे.