
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आता युटूबर अजित भारती याने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. यामुळे युट्यूबर अजित भारती याला नोएडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
‘माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही’; शूज फेकण्यात आल्याच्या घटनेनंतर सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम
युट्यूबर अजित भारती याला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील चौकशी प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. वकील राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश गवई यांच्यावर ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सोमवारी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजित भारती यांनी सोशल मीडिया आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवर या घटनेवर भाष्य केले. ‘ही तर फक्त सुरुवात आहे. अशा हिंदू विरोधी आणि लाचार सरन्यायाधीशांसोबत रस्त्यावर देखील अशाच घटना घडतील. तुम्ही आदेशात लिहिलेल्या गोष्टींशिवाय आपल्या मनाच्या आणि हिंदूंना कमी लेखणाऱ्या गोष्टी बोलाल तर हीच अवस्था होईल, असे युट्यूबरने पोस्टमध्ये म्हटले होते.
अजित भारतीने वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्य केले. अजितचे हे विधान एखाद्या विशिष्ट समुदायाविरुद्ध किंवा न्यायव्यवस्थेविरुद्ध द्वेष पसरवणारे असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यावरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाची प्रतिक्रिया-
”मी जे काही केलं त्याचा मला जराही प्रायश्चित नाही. मी कुणाचीही माफी मागणार नाही. तुम्ही मला प्रश्न करताय. पण मी काहीही केले नाही ही परमात्माची इच्छा आहे. मी जेलमध्ये जावे, मला फाशी व्हावी ही परमात्याची इच्छा असेल म्हणून मी हे केले. मी आधीच ठरवून कोर्टात गेलो होतो कारण 16 सप्टेंबर नंतर मला झोप येत नव्हती. परमात्मा मला झोपेतून उठवून सांगत होता की देश जळतोय आणि तु झोपतोय? त्यामुळे मी हे केले. मी माझ्या सोबत दोन दिवसांची औषधं घेऊन गेलो होतो. मला वाटलेलं दोन दिवस मला तुरुंगात राहावं लागेल. पण सरन्यायधीशांनी माझ्यावर कारवाई केली नाही. याला मी त्यांचे उपकार मानू की काय मानू ते समजत नाहीए. पोलिसांनी माझी चौकशी झाली. त्यांनी मला जेवण दिलं चहा बिस्किट दिला. त्यासाठी मी त्यांचे उपकार मानतो”, असे राकेश किशोर म्हणाले.
देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा