
अर्ध डोकेदुखी होत असेल तर त्याला मायग्रेन असे म्हणतात. यावर काही घरगुती उपाय आहेत. अर्ध डोकेदुखी होत असेल तर शांतपणे आराम करा. डोकेदुखी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे कधी कधी डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
n डोकेदुखीवर थंड कॉम्प्रेस किंवा बर्फाचा पॅक लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. मानेच्या मागच्या भागाला हलक्या हाताने मसाज केल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि डोकेदुखी कमी होते. डोळे आणि मेंदूवर प्रकाशाचा ताण येऊ नये म्हणून दिवे मंद करणे आवश्यक आहे. डोक्यावर आणि मानेवर असलेल्या प्रेशर पॉइंट्सवर दाब दिल्याने वेदना कमी होऊ शकतात. डोकेदुखी जास्त असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.