चेहऱ्याचे सौंदर्य खिलवण्यासाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा

सण समारंभ जवळ आल्यावर अनेकजणी पार्लकडे धाव घेतात. परंतु अनेकदा पार्लरमधील ट्रिटमेंटमुळे चेहरा खराब होण्याची भीती असते. अशावेळी, काही घरगुती उपाय हे कायमस्वरुपी बेस्ट ठरतात. आपण घरी असणारी फळे आपल्या त्वचेवर लावली तर आपण सौंदर्य अधिक चांगले जपू शकतो.

Health Tips – शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणता काढा घ्यावा? जाणुन घ्या

यासाठी अनेकदा पपई, संत्रीचा वापर केलेला आपण पाहिला, ऐकला असेल. मात्र अन्य काही फळेही त्यासाठी उपयोगी ठरतात.

फळांमधून मिळणारे पोषक मूल्य नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला हानी सुद्धा पोहोचणार नाही. त्वचेसाठी फळांमधून खूप सारे चांगले घटक मिळतील. त्यामुळे आपण कोणती फळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले हे बघुया.

पित्तावर हे घरगुती उपाय आहेत सर्वात उत्तम, वाचा

टोमॅटो किंवा टोमॅटोची पेस्ट

टोमॅटो  म्हणजे केवळ फळ न मानता आपण फळ भाजी म्हणतो. त्यामुळे टोमॅटो आपल्या किचनमध्ये कायम असतोच. हे उत्तम आरोग्यदायी फळ आहे. त्वचेला अँटीऑक्सिडेंट बूस्ट आणण्यास टोमॅटोमुळे मदत होते. साधा कच्चा टोमॅटो रोज त्वचेवर लावल्यास सुद्धा आपल्याला खूप आराम मिळतो.

बाजारात असलेला बनावट लसूण कसा ओळखाल?

द्राक्षे

द्राक्षाचा वापर त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. द्राक्षामुळे त्वचेला एक आगळीच चकाकी लाभते. मुख्य म्हणजे द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी अधिक मात्रेत असल्यामुळे द्राक्षे आपल्या त्वचेसाठी केव्हाही बेस्ट. व्हिटॅमिन सी हे निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात.

पचनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत हे फळ दररोज खायलाच हवे, वाचा

चेरी

नितळ त्वचेसाठी चेरीचा उपयोग पाश्चात्य देशात खूप केला जातो. आपल्याकडे आता चेरी हे फळ मिळू लागले आहे. त्यामुळे चेरी खाऊनही आपल्याला अनेक पोषकद्रव्ये मिळतीलच. चेरी त्वचेवर लावल्याने चमकदार नितळ कांती प्राप्त होईल. चेरी देखील अँटिऑक्सिडेंटचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे.