अंबानींकडून केदारनाथ-बद्रीनाथ मंदिराला 5 कोटी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी केदारनाथ आणि बद्रीनाथ धामला भेट दिली. यावेळी अंबानी यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर समितीला 5 कोटी रुपये दान केले. यावेळी केदारनाथ मंदिर समितीचे (बीकेटीसी) अध्यक्ष हेमंत द्विवेदी उपस्थित होते. अंबानी यांची या दोन्ही पवित्र स्थळांवर विशेष श्रद्धा असून ते दरवर्षी या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अंबानी यांनी दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या दानामुळे यात्रेकरूंच्या सुविधा सुधारण्यास मदत होईल, असे हेमंत द्विवेदी म्हणाले. मुकेश अंबानी यांचे आगमन झाल्यावर केदारनाथ बद्रीनाथ मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे फुलांचे हार घालून स्वागत केले. अंबानी मंदिरात पोहोचल्यानंतर गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत मंत्रोच्चाराने केले. त्यानंतर अंबानींनी बद्रीनाथ येथे विशेष प्रार्थना केली. संपूर्ण मंदिर परिसर ’हर हर महादेव’ चा जयघोष करण्यात आला.