
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याने त्याच्या वाढदिवशीच चाहत्यांना गुड न्यूज दिली असून नव्या नात्याची घोषणा केली. हार्दिकने 24 वर्षीय मॉडेल माहिका शर्मा हिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एवढेच नाही तर दोघांना विमानतळावर एकत्र स्पॉटही करण्यात आले. त्यामुळे एक प्रकारे हार्दिकने रिलेशनशीपची कबुलीच दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नताशा स्टॅनकोविक हिच्यापासून घटस्फोट घेतल्यापासून हार्दिक पंड्या सिंगल होता. मात्र आता त्याच्या आयुष्यामध्ये नवीन जोडीदाराची एन्ट्री झाली आहे. हार्दिक पंड्याने माहिका शर्मा या मॉडेलसोबतचा एक खास फोटो आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.
हार्दिक पंड्या याचा शनिवारी वाढदिवस होता. याच दिवशी त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर माहिकासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघेही समुद्रकिनारी निवांत क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. यात हार्दिकपने ओव्हरसाईज जॅकेट, शॉर्टस आणि स्लीपर्स घातल्याचे दिसते, तर माहिताने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश शर्ट घातलेला आहे. हार्दिकने माहिकाच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. हा फोटो शेअर करताना पंड्याने माहिकालाही टॅग केले आहे. त्यामुळे त्याने अधिकृतपणे नात्याची कबुली दिल्याची चर्चा आहे.
कोण आहे माहिका शर्मा?
माहिका शर्मा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिचे नाव सध्या गाजत आहे. तिच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंवरही फॅशन आणि फिटनेस संबंधी कंटेंट शेअर करत असते. तिने काही चित्रपटांमध्येही छोटेखानी भूमिका केलेल्या आहेत. यात ‘इनटू द डस्क’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचाही समावेश आहे. तिने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांच्यासह फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. तिला 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर’ (न्यू एज) हा पुरस्कार देखील मिळाला.