
सुशासन बाबू दुशासन आणि दुर्योधन यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर केली. बिहारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, “तिथे नितीश कुमार त्यांच्या (भाजप) पापाचे भागीदार होत आहेत. जेव्हा नितीश कुमार एकटे होते, आमच्यासोबत होते किंवा भाजपासोबत नव्हते, तेव्हा ते जनतेसोबत होते. आता ते भाजपसोबत मोठ्या उद्योगपतींचे भागीदार बनत आहेत. जर ते आमच्यासोबत असते तर अदानींना बिहारच्या शेतकऱ्यांची १,०५० एकर जमीन कधीच मिळाली नसती.”
भाजपवर टीका करत अतुल लोंढे म्हणाले की, “भाजपने गेल्या ११ वर्षात देशातील जनतेची फसवणूक केली आहे. ते साखर कारखाने आणि मखान्याचा उल्लेख करतात, पण वास्तव सर्वांना माहित आहे.” ते म्हणाले, “महाराष्ट्रात तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरू आहे, ज्यामुळे मोठे उद्योग तिथे स्थलांतरित होत आहेत. राज्यातून रोजगार बाहेर जात आहे.”