रोनाल्डोचा डबल धमाका, पण शेवटी हंगेरीने रडवले!

फुटबॉल विश्वात पुन्हा एकदा ख्रिस्तियानो रोनाल्डो नावाचे वादळ उठलेय. हंगेरीविरुद्धच्या फिफा वर्ल्ड कप पात्रता फेरीच्या सामन्यात या पोर्तुगीज गोलमशिनने दोन जबरदस्त गोल ठोकत नवा विक्रम आपल्या नावे केला. सामना मात्र 2-2 च्या बरोबरीत संपला, पण चर्चेत फक्त एकच नाव राहिले, रोनाल्डो! पहिल्या हाफच्या 22 व्या मिनिटाला रोनाल्डोने क्लोज रेंजवरून गोल करत आपल्या पात्रता फेरीच्या कारकीर्दीतील 40 वा गोल पूर्ण केला आणि ग्वाटेमालाच्या कार्लोस रुईझला (39 गोल) मागे टाकले.